Site Overlay

Home (Marathi)

Event

तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील फुटपाथ ची भयानक, खराब स्थिती पाहून तुम्हाला त्याचा त्रास वाटतो का, याबाबत काही करायला पाहिजे अस वाटत का? तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे.

आमच्यासोबत सामील व्हा आणि “पादचारी चॅम्पियन” व्हा

ह्या कोर्स मध्ये मुलभूत त्या सर्व गोष्टी आहेत, ज्या पादचाऱ्यांना माहित असायला हव्यात. पादचाऱ्यांनी स्वतः पादचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा आणि ऑनलाईन व ऑफलाईनच्या माध्यमातून प्रभावीपणे हे प्रश्न कसे मांडावेत यासाठी पादचाऱ्यांना सक्षम करणारा हा कोर्स आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला पादचारी चॅम्पियन (Pedestrian Champion) चे इ-सर्टिफिकेट मिळेल. ह्या कोर्स मध्ये इंग्रजी, मराठी व हिंदी अश्या तिन्ही भाषांचा एकत्रित वापर केला जाईल. १८ वर्षापुढील कोणतीही व्यक्ती या कोर्स मध्ये सहभागी होऊ शकते.

चालण्यासाठीचे वातावरण सुधारणे का महत्त्वाचे आहे ?

  • पादचारी सुरक्षा
  • आरोग्याचे फायदे
  • मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल
  • वाहनातून उतरल्यावर इच्छित ठिकाणी जाण्यासाठी व इच्छित ठिकाणाहून वाहनापर्यंत जाण्यासाठी
  • कोणताही खर्च नाही, पर्यावरणपूरक पर्याय आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचे.

पादचाऱ्यांचे हक्क

पादचारी म्हणून आपल्याकडे खालील अधिकार आहेत आणि आपण आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी नेहमीच आवाज उठविला पाहिजे.

डिझाईन संदर्भात

  • सर्व रस्ते अश्याप्रकारे डिझाईन केलेले असावेत ज्यावर पादचाऱ्यांना सुरक्षित व सोयीने चालता येईल.
  • प्रत्येक रस्त्यावर पादचाऱ्यांना क्रॉस करता येईल अश्या प्रकारे रस्त्याचे डिझाईन केलेला असावे.
  • रस्त्यावर समान व न्याय्य वाटा असणे.

अंमलबजावणी संदर्भात

  • बेकायदेशीर पार्किंग व फुटपाथवर वाहन चालवणाऱ्यावर कार्यवाही.
  • वाहनांच्या बेशिस्त रहदारीवर कारवाही
  • पादचारी व फेरीवाले विक्रेते यांच्यातील संघर्ष मिटवायला हवा.

देखभाल संदर्भात

  • पदपथांची नियमित देखभाल
  • पदपथ स्वच्छ असतील याची काळजी घेणे (नियमित स्वच्छता करणे, टाकाऊ साहित्य पदपथावर टाकण्यास मनाई करणे)
  • अडथला नसलेले, अखंड, समान, दुर्गंधी विरहीत व कब्जा नसलेले पदपथ

सर्वांना वापर करता येतील असे पदपथ

  • विकलांग व्यक्ती (तात्पुरते / कायमचे अपंगत्व) सर्वांना वापरता येतील असे पदपथ असायला हवेत.
  • किमान १.८ मी. चे पदपथ असणे आवश्यक आहे.
  • रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ असायला हवेत.

इतर

  • पादचाऱ्यांच्या समस्यांना प्रतिक्रिया देणारी कार्यक्षम व्यवस्था
  • सुरक्षित व सोयीस्कर चालता येण्याचे वातावरण सर्तान्व्र असायला हवे.
  • पदपथावर कचरापेटी, शौचालय, पथदिवे, बसण्यासाठी बेंच व सावली असलेली व्यवस्था केलेली असावी.

चांगले रस्ते, पदपथ असणे हे मूलभूत अधिकार आहे. योग्य रितीने रस्ते आणि पदपथ नसल्यास कोणतेही शहर स्मार्ट सिटी बनू शकत नाही

बॉम्बे हायकोर्ट (पीआयएल – ७१.१३)

STEPwalk

Step हा पादचाऱ्यांना एकत्रित आणून त्यांच्या हक्कांसाठी लढणे, संघटीत व कायम मोहीम राबवणारा मंच आहे. 

Recent Tweets

Recent Blog Posts

सार्वजनिक जागांचे शहरी समाज जीवनातील महत्त्व

शहरे म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर जे चित्र उभे राहते ते नेमक कोणते चित्र असते, तर मोठ-मोठ्या उंच इमारती, मोठे रस्ते, पूल,

प्रश्न पायी चालणाऱ्यांचे… साद जनअभियानाची.

परिसर संस्थेने STEP(Steps Toward Empowering Pedestrian) हा मंच उभारला आहे. पादचाऱ्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, आपल्या मागण्या मांडाव्यात

Jane Jacobs

शहरांमधील रस्ते वाहने वाहून नेण्याबरोबरच अनेक गोष्टींची पूर्तता करतात आणि शहरातील पदपथ – रस्त्यांचा पादचारी भाग – पादचारी वाहून नेण्याबरोबरच अनेक उद्देश पूर्ण करतात

जेन जाकोब्स

Pedestrians speak out...

I like to use footpath when it is continuous and obstruction free. Footpaths should be clean, stink free and attractive.

-  Mr. Ritesh Ottari, a pedestrian from Pune.

 

Walking on the road and crossing it has become very dangerous these days due to heavy traffic on the roads.

- Mr. Ajit, a pedestrian from Pune.

Footpaths are in precarious condition, there are lots of potholes on it, so it is very difficult to walk on the footpaths. Many hawkers occupied the pedestrians’ space and we are forced to walk on the road which is very dangerous. Concerned authorities should take right action and make footpaths useable.

- Mr. Shakir Samwari, a pedestrian from Thane

x