Site Overlay

लढ्यात सामील व्हा

पादचाऱ्यांचे प्रश्न

  • बर्‍याच ठिकाणी पदपथ नाहीत.
  • रस्त्यावर चालताना असुरक्षित वाटते
  • रस्ता ओलांडणे खूप कठीण आहे
  • पदपथांवर अतिक्रमणांची संख्या जास्त
  • बेकायदेशीर पार्किंग आणि पदपथांवर वाहन चालविणे
  • खांब, इलेक्ट्रिक बॉक्स, हँगिंग केबल्स इत्यादी पदपथांवर अडथळे.
  • शौचालय, डस्टबिन, बसण्यासाठी शेड असलेले बेंच, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा पदपथांवर नाहीत.
  • असमान पृष्ठभाग, खंडित आणि गलिच्छ पदपथ
  • शहराच्या रस्त्यावर चालणे हा एक सुखद अनुभव नाही
  • ट्राफिक शिस्तीचे पालन नाही.

पादचारी या समस्यांचा सामना का करीत आहेत?

काही कारण खाली दिली आहेत-

  • कोणतेही योग्य नियोजन नाही
  • पदपथांची अनियमित आणि असमाधानकारक देखभाल
  • रस्त्याचे डिझाइन योग्य पद्धतीने नसतात आणि त्या पादचाऱ्यांना दुर्लक्ष केले जाते किंवा फारच कमी महत्त्व दिले जाते.
  • पादचाऱ्यांसाठी सिग्नल, वेळ पुरेशी नसते.
  • अंमलबजावणी खूप कमकुवत आहे
  • रस्ता विभाग आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव
  • रस्त्याचे डिझाइन आणि नियोजन प्रक्रियेत शहर रचनाकार नसतात.
  • आणि सर्वात महत्वाचे – आपण कधीही आपल्या मागण्या मांडत नाही

म्हणून,  बोला, आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवा

  • संपूर्ण शहरात अडथळा मुक्त पदपथ
  • प्रमुख चौकात चालू स्थितीमधील पादचारी सिग्नल
  • शहरभर चांगल्या प्रतीच्या वापरण्यायोग्य व सुरक्षित पादचारी सुविधा
  • फूटपाथवर वापरता येतील असे शौचालय, कचरापेटी, शेड्स असलेले बेंच, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा असाव्यात.
  • प्रत्येक सिग्नलवर सर्वांना दिसतील असे व्यवस्थित मार्क केलेले  झेब्रा क्रोसिंग असावे.
  • शहरातील प्रत्येक रस्त्यावर सुरक्षित क्रॉसिंग आणि शहरातील प्रमुख रस्त्यावर मिडब्लॉक क्रॉसिंग असावे
  • फूटपाथवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी.

आमच्यासोबत सहभागी व्हा

  • STEP चे सदस्य बना
  • तुमच्या परिसरातील पादचाऱ्यांच्या संदर्भातील प्रश्न उपस्थित करा
  • समाजात पादचारी प्रश्नांवर जागृकता निर्माण व्हावी यासाठी तुमच्या परिसरात मिटिंगचे आयोजन करा व त्यात आम्हालाही निमंत्रित करा.
  • STEP च्या कार्यक्रमात/ उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.